आपण दूर जाऊ नये म्हणून मी खूप प्रयत्न केला..

आपण दूर जाऊ नये म्हणून मी खूप प्रयत्न केला..
पण प्रारब्धात होते तेच घडले त्यास कुणी न मुकला..
तुझ्या डोळ्यांना हसताना बघायला आवडायचं..
अन श्वासांना तुझ्या शहारून येताना ऐकायचं..
मिठीत तू विरघळून जायचीस ह्याशिवाय जीवन वेगळे नसायचं..
आता दूर तू दूर मी फक्त आठवणींशी रडायचं..
बरसणारे डोळे अन गहिवरणार्या स्पंदनासोबत झुरायचं..