असे नको ग ... रुसू सखे माझ्यावरी,

असे नको ग ...
रुसू सखे माझ्यावरी,
चुकून डोळा लागला ..
बोलत असता कुशीवरी.

बोल ना ग आता...
झोप गेली लांब तीरावरी,
बोलली नाहीस की ...
नाही करमत मझला तुझ्यापरी..