मोक्ष तुमचा तो देवा । तुम्ही दुर्लक्ष तो ठेवा ।

मोक्ष तुमचा तो देवा ।
तुम्ही दुर्लक्ष तो ठेवा ।
मज भक्तीची आवडी । नाही अंतरी ते गोडी ।
मोक्षाचे आम्हासी नाही अवघड । तो असे
उघड गांठेळीस ।
भक्तीचे सोहाले होतील जीवासी । नवल
तेविशी पुरविता ।
ज्याचे त्यासी देणे कोणते उचित ।
मानूनियां हित घेतो सुखे ।
तुका म्हणे सुखे देई संसार । आवडीसी थार
करी माझे ।
शुभ सकाळ