अरे विचार काय करतोस, काहितरी करून दाखव..

अरे विचार काय करतोस,
काहितरी करून दाखव..
वेळ जाईन निघून,
प्रवाहामध्ये तरून दाखव..
लाखो आले अन गेले,
बोल घेवडे सगळे..
स्व:ता काही नाही केले,
फ़क्त लोकाना उपदेश दिले..
उपदेशाचं कडू तु पिऊन तर बघ..
सत्याची कास धरून तर बघ..
कुणीतरी आपल्या भल्याच सांगत असतं..
एखाद्यावर विश्वास ठेवून तर बघ..
यश आपल्याच हातात असतं रे..
प्रयत्नाची पराकाष्टा करून तर बघ..
होशील खुप मोठा,
स्व:तावर विश्वास ठेवून तर बघ..