भूत,भविष्य,वर्तमान

भूत,भविष्य,वर्तमान
यात तुझ्याच आठवणींची स्पर्धा आहे
कारण माझ्या आयुष्यात व्याकरणात
तूच क्रियापद,कर्म आणि कर्ता आहे
मला वाटतं तू रुसल्यावर
मी हळवी समजून काढावी
तुझ्या गालावरती खळी
मग माझ्या ओठावर दडावी.