B रंग होळीचा असा हा चढतो इथे

B रंग होळीचा असा हा चढतो इथे
भांग प्रेमाची अशी मी भरतो इथे
G सावर सावर प्रिया मजला आवर
पाण्याची मटकी अन दूर ती घागर
B अंग भिजवून थिजवून टाकू असे
बहर ज्वानीचा आज हा कळतो इथे
रंग होळीचा असा हा चढतो इथे
B जल्लोष जोश असा उधाणाला पुन्हा
तुला छेडण्याचा आता केला गुन्हा
G बरे हे खरे तरी मानले तूच रे
झाले मी चिंब रंग ओला जळतो इथे
रंग होळीचा असा हा चढतो इथे
B मी माझा आता तुझा झालो ग
विसुरुनी असा का मलाच गेलो ग
G मीही हरले तुला सख्या रे प्रिया रे
रंग होळीचा प्रेमात भिनतो इथे
रंग होळीचा असा हा चढतो इथे