Greetings Sms


आजही ते कधीकधी एकमेकांशी बोलतात
आजही ते कधीकधी एकमेकांशी बोलतात
कधी मेसेस मधून तर कधी इमेल मधून...
एकमेकांच्या अधूनमधून संपर्कात
असतात...
एकमेकांची खबर ठेवणे
आजही त्यांनी सोडलेले नाही,
समोरच्याला इग्नोर करणं
आजही त्यांना जमलेलं नाही..
जरा काही खट्टा झाला कि एकमेकांची
काळजी करत
बसतात.. कारण आजही ते
कधीकधी एकमेकांशी बोलतात
पण आता पुर्वीसारख उठ सुठ ते
एकमेकांना फोन करत नाहीत,
जर फोन केलाच कोणी तर काय बोलयाच हे
दोघानाही सुचत नाही..
मग फोन वर उगाचच ते शब्दांशी खेळत
बसतात... जेव्हा आज ते
कधीकधी एकमेकांशी बोलतात
त्या दोघांना वेगळ होऊन बरेच महिने
झालेत.. आता ते फक्त चांगले मित्र
म्हणून राहिलेत..
तरीही कधी कधी जुन्या आठवणी मना मध्ये
हळूच डोकावतात... जेव्हा आज ते
कधीकधी एकमेकांशी बोलतात
ती टेन्शन मध्ये
असली कि तिचा पहिला फोन त्यालाच
असतो..
तोही सगळी कामे बाजूला सारून
तिच्यासाठी हाजीर राहतो..
कारण त्याला माहित असत..
फार काही झाल्याशीवाय तिचा आवाज
कातर नसतो...
त्याच्या इतकं जवळच अजूनही तीच
कोणीच नसत ..
मग जोडी दाराच्या नकळत ते
एकमेकांना भेटतात.. कारण आजही ते
कधीकधी एकमेकांशी बोलतात
त्याच्या साठी कधी कधी ती हि कासावीस
होते...
विसर विसर म्हणता म्हणता त्याचीच
होऊन राहते..
पण तिच्या भावना ती शब्दात कधीच
मांडत नाही..
आणि तो हि बोलताना तिच्या डोळ्यात
कधीच बघत नाही..
अस न बोलताच ते एकमेकांना खूप समजून
घेतात.. जेव्हा आज ते
कधीकधी एकमेकांशी बोलतात
दूर जाताना दिलेलं मैत्रीचं वचन ते
अस नेहमीच पाळतात.
मैञी हे नातचं,आहे जे कायम जपायच
असत.
ऐकमेकाच्या यशासाठी,आपल सर्वस्व
अर्पण करायच असत.
जिवनाच्या या वाटेवर,तुझी माझी मैञी जिवंत
राहु दे.
तुझ्या काही आठवंणीवर माझा ही हक्क
राहु दे ....
खरं सांगायचं तर.....
आज-काल मैत्री करायचीदेखील खुप
भीती वाटते ।
कारण....
कुणाशीतरी आपल्याला ती, नकळतच
बांधून टाकते ।
बांधलेते धागे मग, सहजा-सहजी तुटत
नाहीत ।
भावनांचे पीळ त्या नात्यातले,
काही केल्या सुटत नाहीत ।
सुटले पीळ तुटले धागे तरी, ते
जखमा देऊन जातात ।
जखमा त्या डोळ्यांत अपुल्या,
ओलावा ठेऊन जातात ।
ओलावा त्या डोळ्यांतला, लपवू
पाहता लपत नाही ।
डोळ्यांची मिटली झापडे तरी, थेंब
खाली.. पडल्या वाचून राहत
नाही ।
आणि मग...!
का केली मैत्री ही अशी...?
हा प्रश्न मला सतावत राहतो ।
पण मी मात्र सदैव असाच,
मैत्री प्रत्येकाशी करत राहतो. ।
मैत्री म्हणजे काय ?????
कुठलाही गोष्टीची परवा न
करता एकमेकांसाठी काही करून जाणारी
प्रत्येक संकटात
आपल्या माणसांची अनुभूती देणारी
विश्वास आणि आपलेपणाची नाती जपणारी
मैत्री म्हणजे जीवनतील एक अतूट नात
वय , समाज आणि वर्ण याचे बंधन
नसणारी .
मित्रासाठी घासातला घास काढून
ठेवणं खुप सोप असतं,
मित्रासाठी जिव देणंही,
खुप सोप असतं,
पण जीव देण्याइतपत
चांगला मित्र भेटणं
खरंच खुप अवघड असतं..:).....
मैत्रीसाठी पुढे केलेला हात कोणी मागे घेत नसतं .............
पण जीवनभर विश्वासने साथ देणारा हात आपणच आपलं शोधायचा असतो......
सावलीसाठी कोणी स्वताहून आसरा देत नसतं.....
रणरणत्या उन्हात सावलीसाठी एक झाड आपणच आपलं शोधायचं असतं...
फुलाला फुल आवडते...
मनाला मन आवडते....
कवीला कविता आवडते ...
कोणाला काही आवडेल.....
आपल्याला काय करायचे,...
आम्हाला तर फक्त तुम्ह्ची मैत्री आवडते..
Miscall देऊन वैताग आणणारी ,
नेहमी Blank Message पाठवणारी,.

हक्काने जीच्यावर राग व्यक्त करता येईल ,
वेळ घालवायचा म्हणून फोन करून डोक
Out करणारी,....

मूड ऑफ झाल्यावर फालतू विनोद सांगून,
पोट दुखेपर्यंत हसवणारी,.

आपण न सांगताच,
आपल्या मनातलं ओळखणारी,.

कोणाच्याही समोर थट्टा केल्यावर,
न चिडणारी,.

थोडीशी Short - Tempered ,
अशीही एखादी मैत्रीण असावी..
मैत्री
मैत्रीच्या नात्याने
ओंजळ माझी भरलेली...
तुझ्या साथीने आयुष्याची
वाट नव्याने फुललेली...
रात्र होती काळोखी
दुःखामध्ये बुडलेली...
तुझी सावली होती संगे
प्रकाश बनुनि खुललेली...
"पाकळ्यांचं गळणं म्हणजे फुलांचं मरणं असतं.
मरतांनाही सुगंध देणं यातच आयुष्याचं सार असतं,
असं आयुष्य जगणं म्हणजे खरच सोनं असतं.
पण या आयुष्यात तुमच्या सारखे मित्र मिळाले तर,
हे जगणं सोन्याहून पिवळं असतं.