Greetings Sms


नाते किती जुने यावर मैत्री नाही टिकत ,
नाते टिकायला मैत्री खोल असावी लागते ,
कुठेही बी पेरल्यावर झाड नाही उगवत ,
जमीन मुळात ओळी असावी लागते………
मैत्री असावी मना -मनाची ,
मैत्री असावी जन्मो -जन्माची ,
मैत्री असावी प्रेम आणि त्यागाची ,
अशी मैत्री असावी फक्त तुझी नि माझी.......
एक प्रवास मैत्रीचा जसा हळुवार पावसाच्या सरींचा
ती पावसाची सर अलगद येऊन जाते ,
आणि एका सुंदरश्या मैत्रीची आठवण हळूच करून देते.....
मैत्री एक अलगद स्पर्श मनाचा ,

मैर्ती एक अनमोल भेट जीवनाची ,
मैत्री एक अनोखा ठेवा आठवणींचा ,
मैत्री एक अतूट सोबत आयुष्याची
गुलाब उमलतो नाजुक काट्यावर.
गवत झुलते वा-याच्या झोतावर.
पक्षी उडतो पंखाच्या जोरावर.
माणूस जगतो आशेच्या किरणावर.
आणि मैत्री टिकते ती फक्त
"विश्वासावर"
मैत्री असावी पाण्या सारखी
निर्मळ, नितळ, स्वछ जशी।।

मैत्री असावी समुद्रा सारखी
उधाण आलेल्या बेधुंद लाटच जशी॥

मैत्री असावी घनदाट वृक्षा सारखी
थकलेल्या जीवाला सावली देणारी॥
'मैत्री' - जे निस्वार्थ पणे,
केले जातं, तेचं..

'मैत्री' - एक अनमोल नातं...

'मैत्री' - जे रक्ताचं नसलं तरी,
नसानसात भिनतं, तेचं..

'मैत्री' - एक अनमोल नातं...

'मैत्री' - जे सर्व नात्यापासून,
आहे श्रेष्ट, तेचं..

'मैत्री' - एक अनमोल नातं...

'मैत्री' - जे परख्यानाही,
आपलसं करतं, तेचं..

'मैत्री' - एक अनमोल नातं..
बंधना पलीकडे एक नाते असावे,
शब्दांचे बंधन त्याला नसावे,
भावनांचा आधार असावा,
दुख्खाला तिथे थारा नसावा,
असा गोडवा आपल्या मैत्रीत असावा.
लक्षावधी वर्षानी एखादा सुर्य निर्माण होतो,
कित्येक कळप शोधल्यावर कस्तुरी मृग सापडतो,
हजारो शिँपले उघडल्यावर एखादा मोती दिसतो,
शेकडो माणसे आयुष्यात भेटतात पण त्यात,
तुझ्या सारखा मिञ एखादाच असतो.."
नजरेची भाषा कधी बोलकी तर कधी अबोल होते,
कधी स्तब्ध तर कधी निरागस होते,
भावना दाटल्या की अश्रु धारेने ओझरती होते,
हे सगळं समजुन घ्यायला शेवटी फक्त मैत्रीच उरते.!