Greetings Sms


या जगात चांगले मित्र सहजासहजी मिळत नाहीत,
जवळ असताना मात्र एकमेकांची मते जुळत नाहीत,
कळतं सारं काही पण एक मात्र वळत नाही,
काय असते ही मैत्री दूर गेल्याशिवाय कळत नाही.....
मैत्री म्हणजे सुंदर पहाट कधीही न हरवणारी दोस्तीची वाट..
आयुष्याला पडलेलं गोड स्वप्नं, सगळी उत्तरं सापडणारा मजेशीर प्रश्न....
मैत्री म्हणजे सुंदर पहाट
कधीही न हरवणारी दोस्तीची वाट..
मैत्री म्हणजे हवेतला ऊबदार गारवा
अन् जणू दरवळणारा मारवा
मैत्री म्हणजे अत्तराची ईवलीशी कुपी
...दु:खावरची हळुवार जादूची झप्पी

मैत्री म्हणजे न दिसणारा हातामधला हात
नेहमीकरता असणारी तुझीचं साथ.....
सोबत रहा तू फक्त.. इतकंचं एक मागणं आहे...
तू असल्यावर अवघं जीवन देखील गाणं आहे....
मैत्रीसाठी पुढे केलेला हात कोणी मागे घेत नसतं .............
पण जीवनभर विश्वासने साथ देणारा हात आपणच आपलं शोधायचा असतो......
सावलीसाठी कोणी स्वताहून आसरा देत नसतं …….
रणरणत्या उन्हात सावलीसाठी एक झाड आपणच आपलं शोधायचं असतं
"मैत्री" म्हणजे
'संकटाशी'झुंजणारा 'वारा'असतो.
'विश्वासाने'वाहणारा आपुलकीचा'झरा'असतो.

"मैत्री" असा खेळ आहे
दोघांनीही खेळायचा असतो.
एक 'बाद' झाला तरी
दुसर्याने 'डाव''सांभाळायचा'असतो...
विसरु नको तु मला,
विसरणार नाही मी तुला,
विसरतो का कधी कोण आपल्या मिञाला,
मैञीन तर तुच आहेस माझी खास,
कस विसरु शकतो मी तुला.
आयुष्यात त्या व्यक्तीला कधीचं
नका विसरु

जी व्यक्ती तुमच्यासाठी सारे
काही विसरायला तयार
असते....

आयुष्यात त्या व्यक्तीला कधीचं...
नका दुरावू

जी व्यक्ती तुमच्यासाठी सार्यांपासून
दुरावायला तयार असते....
पावसातुन जेवढा ओलावा मिळत नाही
तेवढा जिव्हाळा मैत्रीत मिळतो...
मैत्री मधल्या सावलीचा अर्थ
कधीतरी उन्हातुन गेल्यावर कळतो..
तुझ्या आयुष्याच्या पुस्तकात माझ्या मैञीचे एकच पान असु दे,
सुवर्णाक्षराने नको प्रेमाच्या शाईने लिहिलेले असु दे.
त्या पानाची कडा थोडी दुमडून ठेव,
आठवण माझी यीएल तेव्हा सहजपणे तेच पान उघडून ठेव!
एक प्रवास मैत्रीचा जसा हळुवार
पावसाच्या सरींचा ती पावसाची
सर अलगद येऊन जाते,
आणि एका सुंदरश्या मैत्रीची
आठवण हळूच करून देते

एक प्रवास मैत्रीचा जसा हळुवार
पावसाच्या सरींचा ती पावसाची
सर अलगद येऊन जाते,
आणि एका सुंदरश्या मैत्रीची
आठवण हळूच करून देते