Long Romantic Sms


टोपीवाल्याची गोष्ट आठवते
का लहानपणीची???
आता त्याचा रिमेक ऐका...
एक टोपीवाला गावातून जात असतो, तो दमतो,
म्हणून
झाडाखाली विश्रांती घेतो...
उठून पाहतो तर
झाडावरच्या माकडांनी त्याच्या टोप्या पळवल्या असतात...
त्याला आजोबांची गोष्ट आठवते...
तो स्वताकडची दुसरी टोपी जमिनीवर रागाने
आपटतो...
पण यावेळी झाडावरची माकड त्याच अनुकरण
करत नाहीत....
उलट १ माकड दात दाखवून बोलतो,
"काय रे शहाण्या, आजोबा काय फक्त तुलाच होते
का???" :-D :-D
" अजय आणि पूजा ह्यांचे एकमेकांवर प्रेम होते, पण
नंतर अजयला दुसरी मुलगी मिळाल्यामुळे
तो पुजाला सोडून गेला, पुजाला फार वाईट
वाटले, तिला हे दुख सहन होत नव्हते कारण तिचे
प्रेम खरे होते ........
पुढे ४ वर्षांनंतर, अजय आपल्या मित्रांबरोबर
माथेरान ला फिरायला गेला, तिथे अचानक
अजयला पूजा भेटली, अजयने पुजाकडे तिला सोडून
गेल्याबद्दल माफी मागितली, पूजाने
मोठ्या मनाने त्याला माफ केले. पुढे ६ दिवस ते
एकत्र फिरले, भरपूर मजा केली, पूजा कडे
मोठा कॅमेरा होता, त्यांनी खूप सारे
फोटो काढले .... तेव्हा,
अजय :- पूजा फोटो खूप छान आलेत, सगळे
फोटो मला पाठव हं !!
पूजा :- २ दिवसांनी माझ्या घरी फोन करून
आईकडून फोटो घे, कारण मी बाहेर जाणार आहे.
२ दिवसांनतर .....
अजय ( फोनवर ) :- काकू फोटो पाहिजे होते,
पूजा म्हणाली तुमच्याकडून घे !!
काकू ( पुजाची आई ) :- पूजा ???? अरे
पुजाला जाऊन तर ४ वर्ष
झाली !!!!!!!!
♥ छोटीशी पण मध्यम वर्गीय प्रियकराची गोड प्रेम कहाणी, ♥
प्रियकर :- हा बघ मी नवीन मोबाईल घेतला .....
प्रेयसी :- सहीच, मोठ्ठी पार्टी पाहिजे ..... :-))
( संध्याकाळी प्रियकर तिला ताज हॉटेल मध्ये घेऊन जातो व बोलल्याप्रमाणे मोठ्ठी पार्टी देतो , तेव्हा पार्टी नंतर ........ )
प्रेयसी :- तू एवढे पैसे कसे म्यानेज केलेस
प्रियकर :- माझा मोबाईल विकला .. ♥ ♥ ♥
एक हृदयस्पर्शी प्रेम कथा......
एक मुलगा आणि मुलगी मोटारसायकल वरून
जात होते,
मुलगा खूप वेगाने मोटारसायकल चालवत
होता,
मुलगी घाबरली
तिने त्याला हळू चालवायला सांगितले....
मुलगा : मला आय लव यु बोल...
मुलगी : आय लव यु, आता तरी हळू चालव...
मुलगा : आता मला घट्ट मिठी मार...
मुलीने त्याला घट्ट
मिठी मारली आणि म्हणाली आतातरी हळू
चालव......
मुलगा तिला बोलला कि आता माझे
Helmet काढ आणि ते तू घाल.....
मुलीने ते Helmet घातले
आणि त्याला मोटारसायकल हळू
चालवायला सांगितले... . . .
दुसरा दिवशी पेपरात
बातमी आली कि तो मुलगा अपघातात मरण
पावला पण ती मुलगी Helmet मुळे
काहीहि इजा न होता वाचली.. कारण
त्याला माहित होते
कि मोटारसायकलचा Break fail
झाला होता...! :(
♥ ♥आवडली तर नक्की शेयर करा♥ ♥
आयुष्यात शेवटी आठवणीच
राहतात .
"एका माणसाने आपला नेहमीचा वेष
बदलला, ......... दाढी वाढविली, गळ्यात
सोन्याची जाड चेन, हातात ३ जाडजूड
अंगठ्या घातल्या व भारतातील सर्वात
मोठ्या महाविद्यालयातील मुख्यधापकाकडे
नोकरी मागण्यासाठी गेला,
माणूस :- नमस्कार, मी विद्यार्थाना अतिशय
चांगल शिक्षण देईन, चांगले संस्कार लावेन असे
मी आश्वासन देतो ... मला नोकरी द्या.
मुख्यधापक :- इथे अतिशय उच्चशिक्षित
लोकांना सुद्धा नोकरी मिळणे अवघड आहे, तसेच
तुम्ही तर एका गुंडा सारखे दिसता,
तुम्ही आमच्या विद्यार्थांचे
आणि ह्या महाविद्यालयाचे भवितव्य काय
घडविणार ?
माणूस :- ठीक आहे तर मग
मी ह्या महाविद्यालयाचे विश्वस्त जे भारताचे
मंत्री आहेत त्यांच्याशी बोलतो.
मंत्री :- मुख्यधापक जे म्हणत आहेत ते बरोबर
आहे ......... महाविद्यालयात सुशिक्षित
शिक्षकाची गरज आहे, तुमच्या सारखे लोक
विद्यार्थांचे व ह्या महाविद्यालयाचे भवितव्य
कसे घडवू शकणार ?
(हे ऐकून तो माणूस हसू लागतो ........
आपला खराखुरा वेष समोर आणून म्हणतो....)
माननीय मुख्यधापक व मंत्री साहेब ......... जर
एका महाविद्यालयाचे व विद्यार्थांचे भवितव्य
घडविण्यासाठी अतिशय उच्चशिक्षित
शिक्षकाची जरुरी आहे, तर
आपल्या ह्या मोठ्या भारत देशाचे व भारत
वासियांचे भवितव्य
घडविण्यासाठी सुद्धा नगरसेवकापासून ते
पंतप्रधानांपर्यंत उच्चशिक्षित लोकांची गरज
आहे.
मी माझी वेशभूषा बदलून तुमच्यापर्यंत
तुम्हाला हीच गोष्ट पटवून
देण्यासाठी आलो होतो ....... कृपया भारत
देशाला महाविद्यालया एवढेच महत्व देऊन
उच्चशिक्षित लोकांची भरती आपल्या सरकार
मध्ये करावी.
आईला वाटत असेल की सकाळी रिकामाच तर
बाहेर पडतो हातांसोबत ,
पण कुठलं ओझ घेउन परततो हा रोज रात्री?
आईला वाटत असेल कुणास ठाउक काय करतो, कुठे
असतो दिवसभर?
काय काय भरून नेतो जाते वेळी?
पुस्तक, पेन, कोरे कागद, न्यापकिन, पेस्ट, टूथब्रश,
औषध कुठली,
परवा तर अंडरवेअर भरून घेतली बॅगेत त्याने जणू
तो परतणारच नाहीये
रात्री घरी
विचारावं म्हणून पुढे व्हावं तर घाई घाईत
काहीतरी शोधायला लागतो
कधी कधी बाहेर पडून नाक्यावरून परत येतो
उघडतो कपाटं, फोडतो कुलपं, पुस्तकं धुंडाळतो,
खीसे
चाचपतो उद्विग्नपणे
घरात त्याच काय हरवलय आणि कधी काही कळत
नाही
प्रश्न घेउनच बाहेर पडतो तेव्हा हरवलेलं
सापडलयं
की नाही हेही पुन्हा समजत नाही
कधी तरी अवचीत संध्याकाळीच परततो ,
गप्प, मलूल बसून राहतो,
मला पाहतो तेव्हा पाहतो मलाच अस
बिलकूल वाटत नाही
काय झालय रे तुला अस विचारावस वाटत पण
निसटल्यागत पिंज-
यामधून भुर्र दिशी उडून जातो,
जेव्हा परततो, मध्यरात्रीचा प्रहर मंदपणे सरकत
असतो त्याच्या माझ्या वयावरून
उपास, तापास, पूजा, अर्चा सांगुन
कधी केली नाही
पण हल्ली लाईट घालवून कळोखात हात जोडून
काही तरी पुटपुटताना दिसतो
आईला वाटत असेल की सकाळी रिकामाच तर
बाहेर
पडतो हातां सोबत ,
शेतकरी डोंगरावरच्या देवाच्या दर्शनासाठी निघाला होता.
डोंगर त्याच्या खेडय़ापासून
तसा फार लांब नव्हता. पण
शेतीच्या कामांमुळे अनेक दिवस
जाऊजाऊम्हणत जाणं काही झालं
नव्हतं. दिवसभराचं काम संपलं. त्यानं
भाकरीचं गाठोडं बांधून घेतलं.
एका मित्राकडून कंदील उसना घेऊन
निघाला डोंगराच्या दिशेने....
रात्रीच
गावाची सीमा ओलांडली.
अमावास्येची रात्र, अगदी गडद
अंधार होता.
तो डोंगराच्या पायथ्याशी जाऊन
थांबला. हातात कंदील
होता खरा, पण त्याचा प्रकाश
तो किती? जेमतेम दहा पावले
जाता येईल एवढाच!
अशा परिस्थितीत
तो मोठा डोंगर कसा बरं
चढायचा? किऽर्रऽऽर्र अंधारात
एवढासा कंदील घेऊन चढणे वेडेपणाचे
होईल, असा विचार त्याने
केला आणि मिणमिणणारा कंदील
घेऊन उजाडायची वाट पाहात
तो पायथ्याला बसून राहिला.
बसून
कंटाळा आला तसा उशाला एक
दगड घेऊन मुंडासं पांघरून
आभाळातल्या चांदण्या पाहात
तो पडून राहिला. तांबडं
फुटायची वाट पाहू लागला.
कुणाच्या तरी पावलांची चाहूल
लागली तसा शेतकरी चट्शिरी उठून
बसला आणि अंधाराकडे डोळे ताणून
पाहू लागला....
इतक्या अवेळी या आडवाटेला कोण
बरं आलं? तेवढय़ात कानावर आवाज
आला.
'राम राम पाव्हनं का असं
निजलात?' म्हातारा आवाज
होता. शेतकऱ्याने पाहिलं तो एक
म्हातारा त्याच्याच दिशेने येत
होता. त्याच्या हातात
लहानसा कंदील होता.
शेतकरी म्हणाला, ''राम राम
बाबा, उजाडायची वाट पाहतोय.
म्हणजे डोंगर चढून दर्शनाला देवळात
जाईन.''
म्हातारा हसला.... म्हणाला, ''अरे
जर डोंगर चढायचं ठरवलं आहेस तर मग
उजाडायची वाट का पाहतोस.
कंदील तर आहे की तुझ्यापाशी. मग
कशासाठी इथं पायथ्यालाच आडून
बसला आहेस?''
''एवढय़ा अंधारात
कसा चढायचा डोंगर. काय वेड
लागलंय
का तुम्हाला आणि हा कंदील
केवढासा! अहो, कसंबसं
आठदहा पावलं पुढचं फक्त दिसतंय
याच्या प्रकाशात.'' तरुण
शेतकरी म्हणाला.
म्हातारा हसायला लागला आणि म्हणाला,
''अरे तू पहिली दहा पावलं
तरी टाक. जितकं तुला दिसेल
तेवढा तरी पुढे जा.
जसा चालायला लागशील तसे
तुला पुढचे पुढचे दिसायला लागेल.
फक्त एक पाऊल
टाकण्याएवढा जरी प्रकाश
असला तरी त्या एकेका पावलाने
पृथ्वीला प्रदक्षिणा घालता येते.''
म्हाताऱ्याचं बोलणं तरुण
शेतकऱ्याला पटलं.
तो उठला आणि चालायला लागला आणि कंदिलाच्या प्रकाशात
सूर्योदयापूर्वी देवळात जाऊन
पोहोचलासुद्धा!
वाट पाहात बसून
कशाला राहायचं?
जो थांबतो तो संपतो.
जो चालतो तो ध्येय गाठतो,
कारण चालणाऱ्यालाच
पुढचा रस्ता दिसतो. लक्षात
असूद्या की किमान दहा पावले
चालण्याइतके शहाणपण
आणि प्रकाश प्रत्येकाजवळ
असतो आणि तो पुरेसा असतो.
एकदा एका माणसाला त्यच्या घोड्यासमवेत
एक नदी पार करायची असते. परंतु
त्याला नदीची खोली माहीत
नसल्याने तो तिथेच काठावर
विचार करत बसतो.
मदतीसाठी आजुबाजुला पाहत
असताना त्याला तेथे एक लहान
मुलगा दिसतो.
तेव्हा त्या माणसाने लहान
मुलाला नदीच्या खोलीबद्दल
विचारले.
मुलाने घोड्याकडे एकदा पाहीले
आणि क्षणभर थांबुन
तो विश्वासाने म्हणाला, "
निश्चींतपणे जा,
तुमचा घोडा नदी सहज पार करु
शकेल".
मुलाचा सल्ला मानुन
त्या माणसाने नदी पार करण्यास
सुरुवात केली. परंतु नदीच्या मध्यावर
पोहोचल्यावर त्याच्या लक्षात
आले की नदी खुप खोल आहे.
आणि तो जवळ जवळ बुडायलाच
आला.
कसाबसा तो त्यातून
सावरला आणि बाहेर येउन
त्या मुलावर जोरात खेकसला.
मुलगा पुरता घाबरला होता आणि घाबरत
घाबरतच बोलला, "पण माझी बदके
तर खुप लहान आहेत आणि ते दररोज
नदी पार करतात. त्यांचे पाय तर
तुमच्या घोड्यापेक्षा खुप लहान
आहेत."
उगाच
कोणाचाही सल्ला ऐकण्याआधी त्यांना खरोखरच
काही माहीती आहे का ते जाणुन
घ्या....
एक ग्रेट लव्ह स्टोरी...
एकदा तिच्या वाढदिवसाच्या दिवशी ती तिच्या प्रियकराची वाट बघत बसली होती. खूप खुश होती ती.
आज तिला तिच्या प्रियकराकडून अंगठी मिळणारहोती. ह्या स्वप्नात ती पूर्ण रंगून गेली होती.
तेव्हड्यात तिचा प्रियकर आला ...त्याला बघून तिला खूप आनंद झाला ...... त्याने तिला Birthday -wish केले , आणि वाढदिवसाची भेट म्हणून ... teddy bear दिला ........... teddy bear बघून ती नाराज झाली , कारण…………….. तिला अंगठी पाहिजे होती ..... ह्या रागात तिने तो teddy मागे फेकून दिला. .......... रस्त्यावार पडलेला teddy पाहून तिचा प्रियकर तो teddy उचलायला गेला आणि…………….. आणि तेव्हड्यात मागून येणार्यागाडीने त्याला उडविले ...आणितो जागीच मरण पावला. हे पाहून तिच्या डोळ्यांतून मुसळधार पाउस पडू लागला .... आक्रोश करून ती रडू लागली .......आणि तिने तो teddy घेऊन त्याला घट्ट मिठी मारली....तेव्हड्यात त्या teddy मध्ये असलेल्या machine मधून आवाज आला कि, " प्रिये,अंगठी माझ्या (teddy च्या) खिशात आहे, Will you plz marry me !!!"
"शतानंद"
एकदा कधी चुकतात माणसं

सारचं श्रेय चुकतात माणसं
प्रेम करुन का प्रेम कधी मिळतं
सावकाश हे शिकतात माणसं

गंधासाठी दररोज कोवळ्या
कितीक फुलांस विकतात माणसं
शतकानुशतके कुठलीशी आसं
जपुन मनात थकतात माणसं

हरेत पाकळी गळुनिया जाते
अन अखेरीस सुकतात माणसं
नको रे असं कडु बोलु शता
उगाचच किती दुखतात माणसं