Love Saying Sms


असा दिवस उजाडतो
असा दिवस मावळतो
प्रिय.........तुला पाहण्यासाठी
जीव माझा तळमळतो
तुझा हसरा तो चेहरा
मन माझं मोहून टाकतो
माझ्या प्रेमाचं प्रतीक मी
तुला पुण्यनगरीमध्ये देतो.
तू रोज माझ्या समोरुन जातेस,
पण हिम्मत होत नाही बोलण्याची,
मनात तू आहेस खरी पण
भिती वाटते आय लव्ह यू म्हणण्याची.
भिडते जेव्हा नजरेला नजर
तेव्हा तुझाच विचार मानात असतो,
तू माझ्याशी स्पष्ट कधी बोलशील
मी त्याचीच वाट पाहत बसतो.
तुझ्यापुढं मला हे जगच
वटतं लहान,
जिथं आहे तुझे प्रेम महान,
म्हणून्च माझं आयुष्य
तुझ्यापुढं टाकलं मी गहान.
असंच तू माझ्या डोळ्यांतं पाहावं
आणि मी तुझ्या अस़चं
तू माझ्या डोळ्यांत पाहावं आणि
मी तुझ्या पाहत पाहत
दोघांनी आंधळं व्हावं,
कारण प्रेम हे अंधळच असतं म्हणतात !
कसंसांगू तुला किती जड
झालंय जगायला एकेक महिना
तुझा चेहरा नाही मिळत बघायला.
तुला राग आला
कि तू दिसतोस छान
पण एकटक पाहत राहिले
की खाली झुकवतोस मान
तुझ्या माझ्या जीवनात
एक दिवस असा येणारआहे
तुझी आई माझी सासू व
माझी आई तुझी सासू होणार आहे.
सुखदुःखाच्या वळणावरती
निर्भय होऊनी येशील का ?
ताण मनातला तुझा झुगारुनी
साथ तुझी मज देशील का ?
गळून पडतील दुःखे सारी
रममाण माझ्यात होशील का?
समक्ष तर एक शब्दही बोलत
नाहीस,
मग स्वप्नात कशी येतेस
मनमोकळ्या गप्पा मारायला ?
मी दिवस संपण्याची वाट बघतो
कारण रात्री ओढ असते
मी रात्रीची वाट पाहतो
कारण रात्र स्वप्नांची असते
मी स्वप्नांची वाट पाहतो
कारण स्वप्नात तुझी ओढ असते
मी त्या भेटीची वाट पाहतो
तू माहीत असतेस
मी तुझी वाट पाहातो कारण
तुझ्या शिवाय मी कोणीच नसतो.
युध्दात आणि प्रेमात
सर्व काही क्षम्य असतं पण
महागाईच्या या जगात
युद्धा आणि प्रेम टिकवणं अक्षम्य असतं.