Miss You Sms


प्रेम म्हणजे डोळ्यासमोर झालेली चोरी
पण हि चोरी नेमकी कधी होते कशी होते
समजतच नाही
आणि जे चोरीला गेल आहे ते परत मागवसही वाटत नाही
आणि ज्यांनी ते चोरलय त्याल्या भेटल्या शिवाय
चैनच पडत नाही.....
गरज आहे आज मला..
त्या तुझ्या आधाराची
अडखळनारे पाऊल माझे
सावरणाऱ्या तुझ्या हातांची
गरज आहे आज मला...
त्या तूझ्या मोहक मिठीची
दडपण असता या मनी
तुझ्यात स्वतःला सामावून टाकणाऱ्या त्या बाहूंची
गरज आहे आज मला..
त्या तुझ्या कोमल प्रीतीची
भय दाटताच या मनी
आपलेपणा देणाऱ्या त्या तुझ्या स्पर्शाची
गरज आहे आजहि मला..
माझ्यावरच्या त्या तूझ्या निस्वार्थी प्रेमाची
सारे जग असुरक्षित वाटताच
तू जवळ आहेस या जाणिवेची
गरज आहे मला
खूप गरज आहे...
मला तुझी खूप आठवण येते .....
नाही केलस प्रेम तरी चालेल,पण तिरस्कार माञ करू नकोस,
.नाही काढलीस आठवण तरी चालेल,पण विसरून माञ जाऊ नकोस,
नाही दिलीस ओळख तरी चालेल,पण अनोळखीपणा दाखवू नकोस,
नाही बघितले तरी चालेल,पण बघून न बघितल्यासारखं करु नको,
नाही दिलीस साथ तरी चालेल,पण एकटी माञ राहू नकोस,
छापा असोवा काटा असो...
नाणे खरे असावे लागते...
प्रेम असो वा नसो...
भावना शुद्ध असाव्या लागतात...
तोडु नयेत दुस-याची मने झाडाच्या फांदिसारखी...
कारण झाडाला फांद्या पुन्हा फुटतात पण
मने मात्र कायमची तुटतात....
तुझीच साथ हवी आहे......
तुला विसरायचे म्हटले तर विसरु शकत नाही,

तुझे स्वप्न पडल्याशिवाय रात्र सरत नाही,
नेहमी वाटते तुला आता विसरायचे आहे,

पण तुझ्याशिवाय माझ्या आयुष्यात काय आहे,
खरंच आता आयुष्यात कोणाचा तरी आधार हवा आहे,

पण या आधारात तुझाच स्पर्श हवा आहे,
मी आता खरंच एकाकी आहे, पण.....

मला फक्त तुझी आणि तुझीच साथ हवी आहे...
कुठे असशील तू ....??
कसा असशील...??
माझी आठवण येत असेल का तुला आता....??
.
.
.
.
मला तुझी खूप आठवण येते..
.
.
.
.
कधी कधी तुझ्या आठवणी मला खूप हसवतात,
तर कधी फक्त रडवतात,
काहीही न बोलता निघून जातात,
आणि तरीही आयुष्यात तुझ्या आठवणीच तेवढ्या राहतात...

सांभाळून ठेव माझ्या हि आठवणी.....,
कारण जेव्हा कुणीही नसतं..,
तेव्हा आपल्या जवळ फक्त या आठवणीच उरतात....

म्हणतात ना.... " गेले ते दिवस " " राहील्या त्या फक्त आठवणी "
रोज तुझी आठवण येते आणि
डोळ्यांत पाणी उभं राह्तं...,

तू जवळ हवास असं वाटताना
खूप दूर आहेस..,हे सांगून जातं...
विसरलो नाही तुला मी कणभर
मनात तुझ्या मीही असेन खरंतर !

अजूनही काव्य लिहितो मी तुजवर
वाचत असशील तूही आठवणीने क्षणभर ..!!
रोज तुझी आठवण येते आणि
डोळ्यांत पाणी उभं राह्तं...,

तू जवळ हवास असं वाटताना
खूप दूर आहेस..,हे सांगून जातं..
तू नाही भेटत,
याचे नाही काहीच दु:ख मला..

तू नाहीस तरी,
तुझ्या आठवणींनी कुठं सोडलय मला..?

माहीत आहे आठवणी,
तुझी जागा नाही घेऊ शकत..

पण तुझ्याविना,
मी जगु ही नाही शकत.