Spiritual Sms


ती फ़क्त आईच!!
"सकाळी दोन धपाटे घालुन उठवते
ती आई
उठवल्यावर आवडता नाश्ता समोर मांडते...
ती आई
नाश्ता नाही होतो तोच डब्याची चिंता सुरु करते..
ती आई
काय करीन ते घेउन जा म्हणताना सगळ आवडीचे करते
ती आई
पदराला हात पुसत सांभाळुन जा म्हणते
ती आई
परतिची आतुरतेने वाट बघत असते
ती आई
आपण झोपत नाही तोवर जागी असते
ती आई
आणि जिच्याशिवाय आपले आयुष्य अपूर्ण
ती फ़क्त आईच...
आई म्हणजे मंदिराच्या उंच कळस,
अंगणातील पवित्र तुळस,
भजनात गुणगुणावी अशी संतवाणी,
वाळवंटात प्यावं अस थंड पाणी,
आई म्हणजे आरतीत वाजवावी अशी लयबध्द
टाळी आणी, वेदनेनंतरची सर्वात पहिली आरोळी!
आयुष्य खूप कमी आहे, ते आनंदाने जागा ।
प्रेम मधुर आहे, त्याची चव चाखा ।
क्रोध घातक आहे, त्याला गाडून टाका ।
संकटे ही क्षणभंगुर आहेत, त्यांचा सामना करा ।
आठवणी या चिरंतन आहेत,
त्यांना हृदयात साठवून ठेवा ।।।
!! आईच्या !! गळ्याभॊवती
तिच्या पिल्लानॆ मारलेली
मिठी हा तिच्यासाठी नॆकलॆस
पॆक्शाही मॊठा दागिणा आह
आई" एक नाव ..,
जगावेगळा भाव ...
"आई" एक जीवन..,
प्रेमळ मायेच लक्षण...
"आई" एक श्वास..,
जिव्हाळ्याची रास...
"आई" एक आठवण..,
प्रेमाची साठवण...
"आई" एक वाट..,
आयुष्यातील सर्वात पहिली गाठ...
"आई" एक गोड नांत..,
बहरणारया जीवनाची हिरवी पात...
"आई" एक.. न संपणारी ठेव..,
जीवापाड जपणारी एकमेव...
"आई" एक घर..,
वात्सल्याची सर...
"आई"...नेहमी तुझ नाव घेताना
नेहमी येतो मला हुंदका..,,
तू दिलेल्या जिवनाच ऋण
फेडू शकेल मी का...
प्रेमात हारलात म्हणून आयुष्य संपवण्यात
काहीच
अर्थ नाही...
.
.
.
कारण,
तिला/त्याला कदाचित दूसरा साथीदार
मिळेल....
.
.
.
पण तुमच्या आई-
बाबा ला तुमच्यासारखा मुलगा/
मुलगी कधीच नाही मिळणार..!!!
एक वेळ विचार करा आणि जास्तीत जास्त
शेअर
करा..!!!
एक छोटीशी मुलगी तिच्या बाबां बरोबर
जात होती,
एका पुलावर खूप वेगाने पाणी वाहत होतं.
बाबा: बाळा, घाबरू नको..
माझा हात पकड.
मुलगी: नाही बाबा,
तुम्ही माझा हात पकडा.
बाबा (हसत): दोघांमध्ये काय फरक
आहे बाळा?
मुलगी: जर मी तुमचा हात पकडला,
अन अचानक काही झालं,
तर मी तुमचा हात सोडून देऊ शकते.
पण जर तुम्ही माझा हात पकडला,
तर मला माहितीये की काहीही झालं
तरी तुम्ही माझा हात कधीच
सोडणार नाही..!!
आ म्हणजे आस्था,
ई म्हणजे ईश्वर !!
आई तू उन्हा मधली सावली…
आई तू पावसातली छत्री !!
आई तू थंडीतली शाल…
आता यावीत दु:खे खुशाल!!
आई म्हणजे मंदिराचा कळस…
आई म्हणजे
अंगणातली पवित्र तुळस !!
आई म्हणजे भजनात
गुणगुणावी अशी संतवाणी!!
आई म्हणजे तृष्णेने व्याकूळ
झाल्यानंतर प्यावं असं थंडगार
पाणी!!
आई म्हणजे वेदने नंतरची
सर्वात पहिली आरोळी -:
आ ................ई.....
|| आई ||
.
.
आई म्हणजे असते
एक माये चा पाझर
आई ची माया असते
एक आनंदाचा सागर
.
.
आई म्हणजे असतो
एक घराचा आधार
आई विना ते गजबजलेले
घरच असते निराधार
.
.
आई च्या एक हाकेत
ते घर सारं मावतं
मन-आधारा च्या पोटी
सारयांना आई च घर दावतं
.
.
आई च्या हाताला
असते चव लई भारी
आई चा हाताने
खाण्याची बातच हो न्यारी
.
.
आई च्या कूशीतला तो
विसावा खूप अनमोल
विचलित मनाला तो
नेहमीच देई समतोल
.
.
आई चा राग म्हणजे
बेभान ढगांचा गडगडाट
अवघड असते खुप
तेव्हा सापडणे आपली वाट
.
.
सोसताना वेदना
मुखातून एक शब्द नेहमी येई
प्रेमाचा पाझर पसरून त्या वेदनेवर
वेदना नाहिशी करते आई ...
'आई' साठी आई....
लेकराची माय असते,
वासराची गाय असते,
दुधाची साय असते,
लंगड्याचा पाय असते,
धरणीची ठाय असते,
आई असत जन्माची शिदोरी,
सरतही नाही उरतही नाही..!